ek anokhi prem kahanii…

Standard

valentine डे च्या अनेक शुभेच्या। एक अप्रतिम अशी कहाणी लोकप्रभा मडली इथे देत आहे मला आवडली तुम्हाला आवडली तर नक्की सांगा…

दुपारचे तीन वाजलेले. नेहमीसारखीच सुस्तावलेली दुपार. मात्र दादर स्टेशनवर ही सुस्ती सुतराम नसते. उलट दुपारचा कोलाहल शिगेला पोहचलेला.या कोलाहलातही स्टेशनचा एक कोपरा अचानक सुरेल होतो.वाहत्या गर्दीची पावलं थबकतात.बासरीची धून सरकत्या माणसांच्या अंगांगावरून फिरत कानात साठू पाहते. हा थांबणारा समूह. पण या सुरांची नोंद घेत वाट चालत राहतो. त्याची बासरी ऐकली की दिवसभराचा थकवा क्षणात नाहीसा होतो, असं अनेकजण सांगतात. लोक त्याला थेट ओळखत नाहीत, पण त्याचे सूर मात्र साऱ्यांनाच जवळचे वाटतात.गेल्या दोन-अडीच वर्षांपास्नं दुपारी तीन ते रात्री दहापर्यंत हे आंधळ्या सलीम सिद्दिकीचं दादर स्टेशनवरच्या पुलावरचं बासरीवादन अव्याहतपणे सुरू आहे.आता त्याचा स्वत:चा चाहतावर्ग आहे. पोलिसांपासून ते अगदी चहावाल्या पोरापर्यंत. गाण्यांच्या फर्माइशी होत असतात. बिदागी म्हणून त्याच्या खिशात पैसे पडत जातात.सिमरनही (नाव बदललेलं आहे) त्यातलीच एक.त्याची बासरी ऐकून एक दिवस तिचीही पावलं रेंगाळली.ती थांबली क्षणभरासाठीच.. अन् थबकली आयुष्यभरासाठी!त्याची ही गोष्ट आहे. त्या दिवसानंतर मात्र ती दररोज त्याचं एखादं गाणं ऐकायला थांबायची. त्याला माहीतही नसायचं ती त्याचं गाणं ऐकायला तिथे थांबलीये. कधी सलीम चहा प्यायला गेला असेल तर तो येईपर्यंत त्याची वाट पाहायची. ती त्याच्या बासरीवर बेहद्द फिदा झाली होती.
हळूहळू तिने त्याच्याशी मत्री केली. त्याच्याबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न करू लागली. पण त्याने तो प्रयत्न बराच काळ यशस्वी होऊ दिला नव्हता. तो नेहमीच काहीतरी सांगून वेळ मारून न्यायचा. एकदा तिने खूप हट्ट केला आणि‘‘..मी मूळचा मध्यप्रदेशातील हौशंगाबाद जिह्यातल्या धरमकुंडीचा. घरची परिस्थिती बेतास बात. पण त्यात मुलगा जन्माला आला हे कुठंतरी सुखावणारं होतं. पण हे सुख केवळ क्षणभरच टिकलं. मी अंध असल्याचं लक्षात आलं आणि माझ्या घरच्यांवर कुऱ्हाड कोसळली. आईला हे कळलं तेव्हा कोलमडून गेली. पण ‘‘माझा मुलगा कसाही असला तरी तो मला हवाय,’’ असं ठामपणे वडिलांनी सांगितलं.
‘‘सलीमनं आजपर्यंत केलेला संघर्ष, त्यातून त्याने काढलेले मार्ग, एक कलाकार आणि माणूस म्हणून त्याच्याकडे असलेला चांगुलपणा, त्याची तल्लख बुद्धी, त्याचा नम्रपणा, प्रामाणिकपणा, कष्ट करण्याची वृत्ती या सगळ्या गोष्टी त्याच्याकडे आहेत. नाही ती फक्त दृष्टी. पण म्हणून त्याच्याजवळ असणाऱ्या इतर सगळ्या गोष्टी गौण ठरत नाहीत. उलट त्याच्याजवळ जाणाऱ्या प्रत्येकाला त्याचं चांगुलपण वेड लावतं. त्याच्या प्रेमात पडायला भाग पाडतं. माझ्या बाबतीतही हेच झालं. मी जसजशी त्याच्या जवळ गेले तसतशी त्याच्यात गुंतत गेले.’’ सिमरन सांगते.तिची त्याच्यामधली भावनिक गुंतवणूक एवढी होती की, शेवटी एके दिवशी तिने त्याला सरळ प्रपोज केलं. तिचं धाडस बघून खरोखरच धक्का बसतो. सलीमचा हात मागण्याचा तिने घेतलेला निर्णय तिच्यासाठी खरंच एवढा सोपा होता का? नक्कीच नाही.. ही गोष्ट आई-वडिलांना कळल्यावर त्यांना काय वाटेल? ते खरोखरच सलीमला स्वीकारतील का? समाजाच्या प्रश्नांनाआई-वडील काय उत्तरं देतील? मित्र-मैत्रिणी या प्रेमाला स्वीकारतील का? भविष्यात येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाला सामोरं जाण्याची तयारी आहे का? असे कितीतरी प्रश्न तिने स्वत:लाच विचारले. तिने या प्रश्नांची उत्तरं शोधली.‘‘त्याच्याकडे फक्त दृष्टी नाही. पण यात त्याचा काय दोष? तो अंध आहे म्हणून त्याला कुणावर प्रेम करण्याचा अधिकार नाही का? त्याच्यावर कोणत्या चांगल्या मुलीने प्रेम करू नये का? प्रेम करण्यासाठी समोरचा माणूस मनाने चांगला असणं पुरेसं नाही का? तिच्या मनातले हेच सकारात्मक प्रश्न तिला खऱ्या अर्थाने बळ देत होते. सिमरनच्या या निर्णयाने इतरांचं तर सोडाच, पण सलीमलाच आश्चर्याचा बसला होता. ‘‘ही मुलगी आपल्याशी थट्टा करतेय असंच मला पहिल्यांदा वाटलं. शिवाय आजच्या मुली काय आहेत, कशा आहेत हे मी पाहिलं नसलं तरी ऐकलं जरुर होतं. त्यामुळे माझं धाडस होत नव्हतं. म्हणून मी तिला स्पष्ट नकार दिला. तिला खूप वाईट वाटलं. पण दोन दिवसांनी तिने काहीही न बोलता माझ्या हातात एक पत्रं ठेवलं. मी ते माझ्या मित्राकडून वाचून घेतलं. त्या पत्रात तिने बरंच काही लिहिलं होतं. त्या पत्राची शेवटची ओळ मला आवर्जून सांगावीशी वाटते, ती होती, ‘तुझ्या नशिबात माझं प्रेम लिहिलेलं असेल तर ते तू कितीही नाकारलंस तरी ते तुला नाकारता येणार नाही.’’ ‘‘ते पत्र वाचल्यानंतर ही मुलगी नक्कीच वेगळी आहे असं मला वाटलं. माझ्यासारख्या अंध मुलावर कोणीतरी प्रेम करतंय, आपल्या आयुष्याचा भाग बनू पाहातंय ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. आई गेल्यापासून मला कधी कुणाचं प्रेम मिळालंच नव्हतं. धडधाकट, भरपूर पैसे कमावणारा, भरपूर शिकलेला मुलगा तिला सहज मिळाला असता. पण तिने माझी निवड केली.. माझ्यासारख्या अभाग्यावर प्रेम करणं हीच कितीतरी मोठी गोष्ट होती. मी खूप विचार केला पण तिला नाकारू शकलोच नाही.’’सलीमच्या होकाराने दोघांच्या प्रेमाला सुरुवात झाली. दररोज ऑफिसमधून घरी जाताना ती त्याला भेटायला यायची. न चुकता काहीतरी खायला आणायची. या दोघांचं हे प्रेम पाहून स्टेशनवर ड्युटी करणारे पोलिसांना खूपच आश्चर्य वाटायचं. पण त्यांनी या दोघांना खूप मदत केली. सलीमचं या सर्वाशी असं एक वेगळंच भावनिक नातं तयार झालं होतं. त्या दोघांच्या भेटी अशा वाढतच होत्या. सिमरन नोकरी करायची तेव्हा ते दादरलाच प्रीतम हॉटेलमध्ये गप्पा मारत बसायचे, नंतर ते दोघं मुंबईमध्ये फिरायला लागले. ते फिरायला गेले की लोक त्यांच्याकडे आश्चर्यानं पाहायचे. कोण त्यांच्याकडे कसं पाहातंय हे ती त्याला हळूच सांगायची. दोघांनी थिएटरमध्ये जाऊन चित्रपटही पाहिले आहेत. ती पाहायची अन् तो ऐकायचा. ‘‘चिमणी पाखरं’’ हा त्या दोघांनी थिएटरला जाऊन पाहिलेला पहिला चित्रपट. चित्रपट पाहून आल्यावर आज मी चित्रपट ऐकला असं सलीम त्याच्या मित्रांना सांगायचा. पण सिमरन त्याला ऐकला असं न म्हणता पाहिला असं म्हणायला सांगायची.
‘‘एकदा सिमरनने मला वाद्रय़ाला भेटायला बोलवलं. मी अध्र्या तासात वांद्रय़ाला पोहोचलो. ती आणि तिची मत्रीण माझ्या आधीच स्टेशनवर पोहचल्या होत्या. पण मला मात्र तिच्यासोबत तिची मैत्रीण होती हे ठाऊक नव्हतं. मी गेल्याबरोबर तीने नेहमीप्रमाणे माझ्या खांद्यावर हात टाकला अन् काहीतरी बोलली. पण तिचा आवाज मला वेगळा वाटला. मी लगेचच तिला विचारलं. तेव्हा तिनं तब्येत बरी नाही असं सांगितलं. तरीही मला ती सिमरन नाही असंच वाटत होतं म्हणून मग मी माझ्या खांद्यावरचा तिचा हात हळूच हातात घेतला. तिच्या नकळत बोटातली अंगठी तपासली. ती सिमरनचीच होती. मग माझा संशय जरा दूर झाला. आम्ही बराच वेळ गप्पा मारत बसलो. तेवढय़ात सिमरनचा आवाज आला. ‘‘सलीम ये क्या चल रहा है?’’ अन् त्या दोघीही मोठ्याने हसायला लागल्या. काय झालं पहिल्यांदा कळलंच नाही. पण नंतर कळलं की जिच्याशी मी इतका वेळ बोलत होतो ती सिमरन नव्हे तर तिची मत्रीण होती आणि सिमरन हे सगळं बाजूला बसून ऐकत होती. त्या दोघींनी मला त्या दिवशी फसवायचं असं ठरवलं होतं अन् मी पूर्णपणे फसलो होतो.’’
अशाच भेटींमधून ते दोघंही एकमेकांसमोर हळूहळू उलगडत गेले. ‘‘तो खूप हळवा आहे. त्याला भेटायला गेल्यावर मी नेहमी काहीतरी खायला घेऊन जायचे. त्याला भरवायला लागले की त्याच्या डोळ्यांतून पाणी वाहायचं. मी त्याला अनेकदा त्याचं कारण विचारलं पण तो काहीच बोलायचा नाही. पण एके दिवशी तो स्वत:च म्हणाला की, तू भरवायला लागलीस की मला माझ्या आईची आठवण येते. ती असती तर माझी एवढी फरफट कधी झाली नसती. मला घर सोडावं लागलं नसतं. त्याच्या आयुष्यातली आईची उणीव मला नेहमीच जाणवली आहे. आजही त्याला आईची आठवण आली की घरातली तिच्या फोटोची जुनी फ्रेम जवळ घेऊन तो बसतो आणि तिला शोधायचा प्रयत्न करतो.’’ सिमरन सांगत होती.त्यावेळी त्याची आई हीच त्याचा सर्वात मोठा आधार होती. स्वत:च्या आयुष्याला थारा नसताना मूल सांभाळणं कठीण असतं. त्याच्या आईला त्याच्या भविष्याची खूप काळजी वाटायची.‘‘मला उराशी कवटाळत ती ढसाढसा रडायची. दृष्टी मिळावी म्हणून तिने कितीतरी नवस-सायास केले. वडीलांकडं हट्ट करून अनेक मोठ्या डॉक्टरांकडे मला नेलं. औषधांनी माझ्या दृष्टीत फरक पडेल असं एका डॉक्टरांनी तिला सांगितलं. त्या दिवशी तिला केवढा आनंद झाला होता. ‘माझा मुलगा बरा होणार’ असं त्या आनंदाच्या भरात शेजारपाजारच्या सगळ्यांना तिनं सांगून टाकलं. वडील दिवसरात्र काबाडकष्ट करायचे आणि माझ्यासाठी महागडं औषधं आणायचे. मला पुन्हा दिसू लागेल अशी आशा सगळ्यांच्याच मनात निर्माण झाली होती. पण नियतीच्या मनात मात्र काहीतरी वेगळंच होतं.. मी सहा-सात वर्षांचा असेन. आईचा अपघात झाला आणि त्यातच ती गेली. आई गेल्यानंतर सगळंच चित्र बदललं. माझा मोठा आधार गेला. माझी औषधं बंद झाली आणि माझं हे जग माझ्या डोळ्यांनी पाहण्याचं स्वप्नं तिथेच भंगलं.. ती माझी फक्त जन्मदात्री नव्हती, ती माझ्या अंधारआयुष्यातली मिणमिणती ज्योत होती, माझे डोळेही तीच होती अन् माझ्या आधाराची काठीही.. तिच्याशिवाय आयुष्य म्हणजे आयुष्य नव्हतंच कधी. होता फक्त अंधार, कधीही न संपणारा.. सलीम सांगत होता. आई-गेल्यानंतर काही दिवसांतच त्याच्या वडिलांनी दुसरं लग्न केलं. घरात सावत्र आई आली. पण तिने त्याला कधीही स्वीकारलं नाही. वडिलांनी जवळ घेऊन कधी डोक्यावर मायेने हात फिरवला नाही. त्यामुळं त्याला प्रेम कधी मिळालंच नाही.
सिमरनने त्याच्या आयुष्याचा तो हळवा कोपरा व्यापला होता. पण घरातली परिस्थिती जैसे थेच होती. तो घरी पैसे देऊनही त्याला फारशी किंमत नव्हती. सिमरनची घरच्या लोकांशी भेट घालून द्यावी म्हणून सलीम एकदा तिला घरी घेऊन गेला. घरच्यांशी तिची ओळख करून दिली. पण त्याची सावत्र आई तिच्याशी काहीच बोलली नाही. त्याच दिवशीचाच आणखी एक असाच प्रसंग. सलीम जेवत होता. सिमरन बाजूलाच उभी होती. सलीमच्या ताटातली भाजी संपली. सिमरनने हे पाहिलं आणि ती त्याला भाजी वाढायला समोर गेली. पातेलं हातात घेताच सलीमच्या आईने तिला थांबवलं. तिला भाजी वाढू दिली नाही. सिमरनला या गोष्टीचं खूप वाईट वाटलं. कारण हे त्याच्यासाठी रोजचं असलं तरी तिच्यासाठी ते नवीन होतं. पण ती आईला उलट बोलली नाही. ती तिथून निघून गेली. घरून तिने त्याला फोन केला आणि ढसाढसा रडायला लागली. ती फक्त एवढंच करू शकत होती..या प्रसंगानंतर तिला त्याचं घर व्यवस्थित कळलं. त्याच्या दु:खाचं कारणही तिला माहीत आहे. त्यामुळे तो त्यातून बाहेर यावा म्हणून ती नेहमी प्रयत्न करते. एकदा तिचा ग्रुप पिकनीकसाठी रिसॉर्टला जाणार होता. सिमरनने सलीमलाही बोलावलं. पण त्याला पाहिल्यानंतर तिच्या मित्रांनी टिंगलटवाळी सुरू केली. ‘‘अरे, याला तर एकच बॅटरी आहे आणि तिचाही काही उपयोग नाही.’’ अशा अपमानास्पद कमेंट्स पास केल्या. सिमरनला ते सहन झालं नाही. तिला खूप राग आला. ‘‘दोन बॅटरी असणाऱ्यांनाच मन असतं आणि सिंगल बॅटरीवाल्याला ते नसतं का, डोळे असणाऱ्या तुम्हा आंधळ्यांपेक्षा डोळे नसलेला सलीम खूप चांगला आहे’’, असं बरंच काही तिने त्या सगळ्यांना त्या वेळी सुनावलं.‘‘ते माझ्या प्रेमाचा अपमान करतील, त्यावर हसतील ते माझे चांगले मित्र असू शकत नाहीत’’ असं सांगून तिने पिकनीक अध्र्यावर सोडली आणि सलीमला घेऊन ती तिथून निघून गेली. पुन्हा ती त्या ग्रुपमधल्या मुलांशी ती कधीही बोलली नाही.
सर्व काही व्यवस्थित सुरू असतानाच यांच्या प्रेमकहाणीत एक वादळ आलं.सिमरनच्या वडिलांना कोणीतरी सांगितलं की ‘‘आपकी लडकी किसी नाभिने (अंध) लडके के साथ घूम रही थी।’’ साहजिकच त्यांना प्रचंड धक्का बसला. कारण घरातलं वातावरण अत्यंत कडक शिस्तीचं, खानदान की इज्जत जपण्यासाठी काहीही करू शकणारं.. तिथं प्रेम या शब्दाला कसलाच थारा नाही. आपल्या मुलीने एका अंध मुलावर प्रेम करावं, तेही स्टेशनवर उभं राहून बासरी वाजणाऱ्या. ही गोष्टच त्यांच्या कल्पनेपलीकडची होती. त्यांनी सिमरनला समजून सांगण्याचा खूप प्रयत्न केला. ‘‘प्रेमाने पोट भरत नाही, त्यासाठी भाकरी लागते’’, असे डायलॉगही ऐकवण्यात आले. पण तिने तिचा निर्णय बदलला नाही. रोज नवे बहाणे करून ती त्याला भेटायला जायचीच. पण काही दिवसांनी ते तिच्या घरच्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे तिला घराबाहेर पडायला बंधनं घातली गेली. नोकरी सोडायला भाग पाडलं गेलं.त्यामुळे त्याला भेटणं तर फारच अवघड झालंय.
मात्र या वादळातही ही दोघं आज घट्ट पाय रोवून एकमेकांना सावरत उभे आहेत. एक दिवस हे वादळ नक्की शमेल आणि आम्ही कायमचे एकत्र येऊ असा दोघांनाही विश्वास आहे. ‘‘मला माहिती आहे, आज तिला माझ्यासाठी खूप गोष्टी सहन कराव्या लागताहेत. पण मला त्रास होईल म्हणून ती कधीच काही सांगत नाही. उलट मी खूप आनंदात आहे. तू फक्त तुझी काळजी घे एवढंच सांगते. ती माझ्या आयुष्यात आल्यापासून सुख, आनंद नावाची गोष्ट खऱ्या अर्थाने मला अनुभवता आली. ती माझी फक्त प्रेयसीच नाही तर आई, वडील, मित्र हे सगळं आहे. तिनेच माझ्या जगण्याला खरा अर्थ दिलाय. अंधारलेल्या जगातली ती माझी प्रकाशवाट आहे’’, सलीम सांगत होता.आज ती त्याच्यापासून भेटायला न मिळाल्याने थोडी दूर गेलीय त्यामुळे तो थोडा एकटा पडलाय आणि या एकटेपणात तिच्या आठवणींसह त्याच्यासोबत आहे ती फक्त त्याची बासरी.
ही बासरी त्याच्या आयुष्याचा कणा आहे.त्याची आणि बासरीची पहिली भेट झाली शाळेत असताना. अगदी योगायोगाने. त्याने सांगितलेली बासरीची कथा खूपच रंजक होती. ‘‘शाळेतील संगीताच्या शिक्षकांनी बासरीच्या वर्गासाठी विद्यार्थीची निवड करायचं ठरवलं. त्यासाठी प्रत्येक वर्गात जाऊन त्यांनी मुलांची निवड केली. एकदा ते आमच्या वर्गात आले. ‘‘एकूण सूर किती’’ त्यांनी मुलांना प्रश्न विचारला. अनेकांनी अनेक उत्तरे दिली. कोणी दहा, कोणी पंधरा, कोणी सात असे अनेकांकडून अनेक सूर समोर आले. सरांनी मला विचारलं, पण त्याचं उत्तर मलाही माहिती नव्हतं. परंतु शेजारच्या माझ्या मित्रानं मला त्याचं उत्तर हळूच कानात सांगितलं. मी उत्तर दिलं. संगीतात एकूण १२ सूर असतात. माझं उत्तर बरोबर आलं म्हणून सरांनी बासरीच्या वर्गासाठी माझी निवड केली. पण माझ्या ज्या मित्राने त्या प्रश्नाचं उत्तर मला सागितलं होतं त्याला मात्र बासरीच्या वर्गात प्रवेश मिळाला नाही, कारण त्याला दम्याचा त्रास होता. त्याचं मला आजही वाईट वाटतं. माझ्या मित्राने सांगितलेल्या एका उत्तराने आज मला आयुष्याची भाकरी मिळाली आहे.’’‘‘मला नेहमी वाटायचं घर सोडून निघून जावं. पण मला नीट चालताही येत नव्हतं, मग पळून जाणार कसा? तरी एक दिवस मी घरातून पळून जायचा निर्णय घेतला. चालताना, पायऱ्या उतरताना, चढताना अंदाज कसा घ्यायचा, गर्दीतून कसं चालायचं, रस्ता कसा ओलांडायचा याचं सगळं तंत्र मी एका मित्राकडून शिकून घेतलं. काही महिन्यांनंतर ते मला जमायलाही लागलं. शेवटी एक दिवस मी अंगावरच्या कपडय़ांसह शर्टात बासरी अडकवून घर सोडलं. थेट मध्यप्रदेशात गेलो. स्टेशनवर, रेल्वेत बासरी वाजवून मिळालेल्या पशांवर पोट भरू लागलो. आज एका ठिकाणी तर उद्या दुसऱ्या ठिकाणी असा रोजचा प्रवास सुरू होता. थंडीचे दिवस होते. जवळ काहीच नव्हतं. पसे नव्हते असं नाही, पण रोजचा प्रवास असल्यानं घेतलेली वस्तू ठेवायची कुठे हा प्रश्न होता. मजल दरमजल करत एक दिवस मध्यप्रदेशातील खांडव्यात पोहचलो. तिथे अनेक चांगली माणसं भेटली. रेल्वे स्थानकावरच्या पोलिसांनी खूप मदत केली. आसराही दिला, मात्र अशी मदत करताना त्यांनी एक अट घातली.. मी त्यांना रोज संध्याकाळी काही गाणी ऐकवायची. मी त्यांना गाणी ऐकवू लागलो. काही दिवस तिथेच राहिलो. एक दिवस तेथील पोलीस इन्स्पेक्टरने मला घर सोडण्याचं कारण विचारलं. मी त्यांना सगळी हकिकत सांगितली. दुसऱ्या दिवशी ते मला घेऊन घरी आले. आई-वडिलांना समज दिली आणि मी पुन्हा एकदा घरात आलो.’’ घरी परतल्यानंतर तो मुंबईतल्या स्टेशनवर थांबून बासरी वाजवायला लागला. चांगले पैसे मिळवू लागला.या बासरीनं केवळ त्याचं पोटच भरलं नाही तर त्याच्या एकटेपणात त्याला नेहमीच साथ दिली. आजपर्यंत आयुष्यात आलेलं प्रत्येक दु:ख या बासरीनंच त्याला विसरायला शिकवलं. दोन महिन्यांपूर्वी ती त्याला शेवटचं भेटली. त्या दिवशी निरोप देताना मी परत येईन असं वचन देऊन ती निघून गेलीय. आजही स्टेशनच्या पुलावरील गर्दीत त्याच्या बासरीचे सूर मिसळताहेत. काहीतरी शोधत आहेत.. दादर स्टेशनच्या पुलावर तुम्ही कधी गेलात तर सलीमचे ते सूर तुमच्याही कानावर पडतील. vilas.bade@expressindia.com

Advertisements

My Dream….

Standard

हे घडेल का महाराष्ट्रात?

झोप झालेली नसते त्यावेळेस अहमदाबाद येतं. सकाळ काहीशी निळसर वाटते, थांबल्यासारखी. दिवस उजाडण्यापूर्वी भरून राहिलेलं एक निशब्द जग. अहमदाबादला उतरतो, घ्यायला गाडी आलेली असते. मला गांधीनगरला जायचं असतं. गाडीत बसतो. अहमदाबाद रेल्वे स्टेशनवर कायम गर्दी असते. काही जण अजूनही झोपेतच असतात. पण गाडी गांधीनगर रस्त्याला लागली की शहर भर्रकन संपल्यासारखं वाटतं. शहरात कुठेही राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या होर्डींग्ज नाहीत की सकाळी सकाळी त्यांच्या मुंडक्यांचे फोटो पाहावे लागतील. मोदींचेही कुठे होर्डींग्ज दिसत नाहीत. अहो आश्चर्यम.
अहमदाबाद कुठं संपतं आणि कुठं गांधीनगर सुरु होतं हे लक्षात येत नाही. पण गाडी चकाचक रस्त्यांना लागली, ट्रॅफिकचे साईन बोर्ड सगळे जिथल्या तिथं दिसले, थोडीशी झाडी दिसायला लागली, स्वच्छ चौपदरी रस्ता लागला की आपण गांधीनगरमध्ये असल्याचं ओळखायचं. माझी आणखी एक खूण. गाडीनं नर्मदेचा पाण्यानं भरलेला कॅनॉल ओलांडला की गांधीनगरमध्ये पोहोचल्याची पक्की खून पटते. मला ही जास्त जवळची वाटते, कारण हे शांतपणे वाहणारं पाणी सातपुड्याच्या डोंगरात पडलेलं असेल ज्यानं गुजरात समृद्ध होतोय.
गांधीनगर हे राजधानीचं शहर. पण गुजरातची आर्थिक राजधानी अहमदाबादच. सगळे बाजार, व्यवहार अहमदाबादमध्येच. काही मोठी खरेदी करायची झाली तरी गांधीनगरहून अहमदाबादलाच आलेलं बरं. २० किलोमीटर पाऊणतासाचा रस्ता. अहमदाबाद-गांधीनगर म्हणजे दोन जुळी शहरं. सिकंदराबाद-हैदराबाद किंवा पुणे-पिंपरी चिंचवडसारखी.

जसे अहमदाबादमध्ये कुठल्या पक्षाचे पोस्टर्स दिसत नाहीत तसे गांधीनगरमध्येही नाहीत. ना काँग्रेस, ना भाजपा, ना नरेंद्र मोदी. गेल्या तीन एक महिन्यांपासून माझी कधी महिन्याला तर कधी पंधरा दिवसाला मुंबई-अहमदाबाद-गांधीनगर अशी फेरी असते. होत राहतील आमचं एक घर सध्या गांधीनगरला आहे.

गांधीनगरला होणाऱ्या चकरांनी माझ्यात सर्वात मोठा कुठला बदल झाला? मला वाटतं नरेंद्र मोदींबाबत माझं मत पूर्णपणे बदललं. मत बनवण्याची माझी एक पद्धत आहे. कुणी कितीही सांगितलं तरी इतरांच्या सांगण्यावरून माझं अमुक अमुक म्हणून मत बनत नाही. एक तर प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा प्रयत्न करतो किंवा मग सारासार विचाराची फुटपट्टी लावतो. मोदींबाबतही तसेच.

मोदींबात पाच सहा वर्षापासून उलटसुलट बरंच काही ऐकून झालंय. त्यामुळे नैसर्गिकरित्या एक प्रतिमा डोक्यात तयार झाली. गुजरात दंगे घडवणारे मोदी. ते वास्तव आहेच. ते मोदीही नाकारणार नाहीत. पण तरीही मी मोदींच्या नेतृत्वानं भारावलोय.

गुजरातमध्ये सध्या व्हायब्रंट गुजरात समिट सुरु आहे. हे पाचवं जागतिक संमेलन. जवळपास ८० देशातून उद्योगपती गांधीनगरला तीन दिवसांसाठी एकत्र आलेत. गुजरातच्या विविध भागात गुंतवणूक होण्यासाठी मोदींनी सुरु केलेलं हे संमेलन दरवर्षी भरतं. एका व्यासपीठावर येण्याचं टाळणारे अंबानी बंधू मोदींच्या दोन्ही बाजूला बसलेले दिसतायत. एवढंच नाही तर टाटा, गोदरेज, महिंद्रा ही मंडळीही व्यासपीठावर आहेत. त्यांच्यासोबत देशोदेशीचे उद्योगपती गुजरातच्या गुंतवणुकीवर चर्चा करतायत. मोदींना हे जे जमलंय ते केंद्राला तरी जमेल?
गुजरात हे उद्योगी लोकांचं राज्य आहे. इथले लोक रेल्वेत टक्क्यांच्याच गप्पा मारतात हा माझा अनुभव. पण मोदी फक्त व्यापाऱ्यांचंच हित सांभाळतात का? नाही. मोदींनी गेल्या काही काळात राबलेल्या काही भन्नाट आयडीया त्याचा पुरावा. काही आठवड्यांपूर्वी गेलो होतो त्यावेळेस तिथं मोदींच्या ‘स्वागतम’ची चर्चा सुरु होती. मी थोडीशी माहिती घेतली आणि अवाक झालो.

स्वागतमची आय़डिया अशी. समजा तुमचं एखादं काम भूमी अभिलेख कार्यालयात आहे आणि तिथला अधिकारी तो करत नसेल तर ते काम घेऊन तुम्ही तालुका ‘स्वागतम’मध्ये जायचं. तहसिलदार दर्जाचा किंवा वरिष्ठाकडे तक्रार द्यायची. समजा त्यानंही काम नाही केलं तर ‘जिल्हा स्वागतम’मध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे जायचं. जिल्हाधिकाऱ्यानेही तक्रारीची दखल घेतली नाही तर मोदींकडे जायचं. मोदी ‘स्वागतम’मध्ये आलेल्या तक्रारी संबंधित विभागांकडे पाठवल्या जातात. संबंधीत अधिकाऱ्यांसह राज्यभरातले जिल्हाधिकारी, एसपी मोदींसमोर लाईव्ह असतात. व्हीडिओ कॉन्फरन्सद्वारे दर काही महिन्यांनी सीएम स्वागतम असतंच.

तक्रारदाराला मोदी बाजूच्या खुर्चीवर बसवतात आणि संबंधीत अधिकाऱ्याला जाब विचारतात, का रे बाबा या व्यक्तीचं काम का नाही झालं? अधिकाऱ्यानं जर सांगितलं की तक्रारदारानं आवश्यक असलेले कागदपत्रं पुरवली नाहीत तर मोदी तक्रारदाराला विचारतात..समजा चूक अधिकाऱ्याची असेल तर मोदी तिथंच आदेश जारी करतात. आणि समजा तक्रारदारानं आवश्यकबाबींची पूर्तता केलेली नसेल तर त्याला तसं सांगतात. पण मोदी निर्णय देतात हे नक्की. विशेष म्हणजे हिरोगिरी करत नाहीत. म्हणजे उगीचच अधिकाऱ्यांना झापत नाहीत किंवा तक्रारदार सरळ मोदींकडेच आला असेल तर त्याला अगोदर संबंधीत पहिल्या अधिकाऱ्याकडे पाठवतात. तालुका स्वागतममध्ये हे विशेष.
स्वागतममध्ये जाऊन आलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यानं सांगितलेलं अनुभव अधिक बोलका आहे. एक जण मोदी स्वागतममध्ये एका अनाधिकृत बिल्डिंगची तक्रार घेऊन गेला. बिल्डींग तर अनाधिकृत आहेच पण सोसायटीतले लोक त्रास देतायत अशी तक्रार. मोदीनं संबंधीत शहराच्या जिल्हाधिकारी आणि संबंधीत पालिकेच्या अधिकाऱ्यांना विचारलं की तक्रारीत किती तथ्य आहे? अधिकाऱ्याला स्पष्ट उत्तर देता येईना? त्याची तारांबळ उडाली? मोदींनी एक साधा प्रश्न विचारला की बिल्डींग अनाधिकृत आहे की नाही? अधिकाऱ्यानं अखेर सांगितलं हो..अनाधिकृत आहे..मग पाडली का गेली नाही? मोदींचा पुढचा प्रश्न. कारण बिल्डींगमध्ये सगळे दादा लोक राहतात. अधिकाऱ्याचं उत्तर..मोदींनी फॅक्सवरून बिल्डींगचे सगळी कागदपत्रं लगेचच मागवून घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ती तिथंच तपासली आणि बिल्डींग अनाधिकृत असल्याचं सांगितलं. मोदींनी आदेश दिला की ही बिल्डींग उद्या संध्याकाळपर्यंत पडली पाहिजे मग ती कुणाचीही असो आणि तसा रिपोर्ट सादर करा… मोदींचा झटपट निर्णय.

या स्वागतमचा परिणाम असा आहे की कुठलाच अधिकारी एखाद्या व्यक्तीला भेटायचं टाळू शकत नाही. कारण भेट टाळली तर तो तक्रार मोदींकडे घेऊन जाईल अशी भीती. त्यातून अधिकाऱ्यांना तक्रारदारांची फक्त भेटच घ्यायचीय असं नाही तर तक्रारीचं निवारणंही करायचंय म्हणजेच काहीही करून कामातून सुटका नाही. आपल्याकडे कधी हे होईल? आमदार, मंत्र्यांचा दरबार भरवला तर त्यात तेच गायब असतात आणि अधिकारीही तिकडं फिरकत नाहीत.
मोदींनी इतर राबवलेल्या काही कल्पनांनी तर अवाक व्हायला होतं. गुजरातला वाचतं करायचंय तर काय करावं? मोदींनी सांगितलं ‘वाँच्छे गुजरात’. म्हणजे राज्यातल्या सामान्य लोकांसह सगळे अधिकारी मग तो कारकून असो की सुपर क्लास वन. सगळ्यांनी कुठल्याही वाचनालयात जाऊन तासभर वाचायचं. काहीही वाचा पण वाचा. त्याची सुरुवात खुद्द मोदींनी केली. मोदीच गेले म्हटल्यानंतर मंत्री गेले, अख्ख मंत्रीमंडळ गेलं म्हणजे अधिकारीही गेलेच, जावंच लागणार तसा अधिकृत आदेश असतो. अन्यथा कारवाई त्यामुळे दांडीला संधी कमी. वाचनाचा अहवाल अधिकाऱ्यांना सादर करावा लागतो. त्यावर चर्चा होते. आपल्याकडे जसं ज्ञानेश्वरीचं पारायण होतं तसं गुजरातमध्ये वाँछे गुजरातची पारायणं लागली. अख्खं गुजरात वाचत राहिलं. एका कल्पनेनं अख्खा गुजरात जोडला गेला. करिश्मा तयार होणार नाही तर काय?

पुढच्या दोन आयडिया ऐकल्यानंतर तर तुम्हीही मोदींना दाद द्याल. मोदींनी ‘गुणोत्सव’ नावाचा कार्यक्रम राबवला. म्हणजे राज्यातल्या सगळ्या अधिकाऱ्यांनी मग तो क्लास वन असो की सुपर क्लास वन. प्रत्येक दिवशी पाच असं तीन दिवस १५ शाळांमध्ये जाऊन शिकवायचं. तीन दिवसांसाठी ही त्यांची अधिकृत ड्युटी. राज्याच्या मुख्य सचिवाचीही सुटका नाही. काय शिकवलं त्याचा अहवाल सादर करायचा. कुठल्या अधिकाऱ्यानं कुठल्या शाळेत शिकवायचं याची अधिकृत लिस्ट दिली जाते. कुणीही उठून कुठेही जायचं नाही आणि पाट्या टाकून यायचं नाही. गावात गेल्यानंतर अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांशी बोलायचं. समस्या जाणून घ्यायच्या. एखाद्या घरातले जर मुलीला शाळेत पाठवत नसतील तर त्यांच्याशी बोलायचं. पुस्तक, गणवेशाचा प्रश्न असेल तर तो तिथंच सोडवायचा. परिणाम असा की राज्याच्या मुख्य सचिवालाही शाळेची काय स्थिती आहे हे कळतं आणि लोकांनाही सरकार आपल्या शाळेत येतं याचं समाधान वाटतं. परिणाम गुजरातमधल्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुका झाल्या. मतदानाची टक्केवारी होती ९२ टक्के. सत्ता अर्थातच भाजपाचीच म्हणजेच मोदींचीच.

लोक आणि प्रशासन यांच्यातलं अंतर मिटवायचं? काय करावं? मोदींनी सांगितलं ‘खेलोत्सव’ म्हणजे अख्ख्या गुजरातनं खेळायचं. कल्पना चांगली आहे पण वाटतं तितकी सोपी नाही. पैसा, व्यवस्था राबवावी लागते. पण ती हिट झाली. खेलोत्सवमध्ये अगोदर गाव पातळीवर लोका, स्थानिक नेते, अधिकाऱ्यांनी खेळायचं. खेळ कुठलाही असो. खेळायचं. नंतर तालुक्यावर खेळायचं त्यानंतर जिल्ह्यावर नंतर विभागावर आणि नंतर फायनल राज्यपातळीवर. इथंही सगळं अधिकृत… खेळासाठी मोदी सरकार पैसे उपलब्ध करतं. खेळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या ड्युटी तशा लावल्या जातात. गाव, तालुका, जिल्हा, विभाग सगळीकडे खेळ होतायत म्हणजेच आपोआपच मैदानं तयार झाली, असलेली सुधारली, नवीन खेळाडू मिळाले. अधिकाऱ्यांसोबत दोन हात करायची संधी लोकांना मिळाली. लोकांचा आणि अधिकाऱ्यांचा उत्साह ओसंडून वाहणारा. काही अधिकारी त्यांच्या टीमची चर्चा करतायत हे दृश्यच मला सुखावणारं होतं. मोदी द ग्रेट.

आणखी एक गोष्ट सांगण्याचा मोह आवरत नाही. आता ज्या ठिकाणी व्हायब्रंट गुजरात समिट होतेय तिथंच मोदींनी महात्मा मंदिर उभारलंय. मंदिर म्हणजे गांधीजींचं मंदीर नाही तर त्यांच्या नावावर एक मोठी वास्तू उभी केली आहे, ज्यात समिट होत आहे. महात्मा मंदिराची उभारणीही भन्नाट झाली. मंदीराच्या पायाउभारणीचा दिवस ठरवला. त्या दिवशी प्रत्येक गावच्या सरपंचाला गावची माती आणि पाणी घेऊन गांधीनगरला बोलवलं. खुद्द मोदींनी प्रत्येक सरपंचाकडून माती-पाणी स्वीकारलं आणि त्यातून पायाभरणी झाली. प्रत्येक जोडप्याची व्यवस्थित आणून सोय केली. बोलवलं आणि वाऱ्यावर सोडलं असं नाही. मोदींच्या एका कल्पनेनं दूर गावात असलेला गावकरी आणि समिटमध्ये बसून चर्चा करणारा उद्योगपती जोडला गेला. चर्चा करणारे कुठल्या तरी दुसऱ्या जगातले लोक आहेत ही भावना त्या गावकऱ्याच्या मनात येण्याऐवजी तो आपसूकच उद्योगपतींशी जोडला जातो. म्हणजे भारत आणि इंडिया मोदींनी एका कल्पनेनं जोडण्याचा प्रयत्न केलाय.

गुजरात आणि महाराष्ट्र दोन्ही जुळी भावंडं. दोन्ही सुवर्णमहोत्सव साजरा करतायत. मला महाराष्ट्रात एकदाही त्याचा फील आला नाही. गुजरातमध्ये त्याचा विसर पडत नाही. मी इथं एकही प्रश्न उपस्थित करणार नाही, कारण हे वाचल्यानंतर जे तुमच्या मनात येईल तेच माझ्या मनात आहे.

पुढची निवडणूक ज्यावेळेस येईल त्यावेळेस जर राहुल गांधींना मतदान द्यायचं की पंतप्रधानपदासाठी मोदींना तर मी मोदींची निवड करण्याचं निश्चित केलंय. कारण दंगली कोण घडवत नाही? पण एखादा तरी सुपर क्लास वन अधिकारी मग तो आयएएस असो की आयपीएस मला माझ्या गावात येताना पाहायचंय जे सध्या ते अशक्य वाटतं.

Hush Hush…

Standard

Past month has been a very busy month on professional front. The project work which is assigned in company is near to completion and we all are in euphoric statte.. we can see the application is being devloped and the final paper for the draft is almost ready only inputs from data which will be finalised by next week is under process…
Its been in a long month with much of anticipation, hope and despair. The project was started with simple initative of generating the data from sales point of view. What started as sales project is now a new learning experience for all of us. Right from co ordinating for the project work with clients whom we are directly not involved, competitors data and comaprison and finally the genaration of data was learning experience..
I am checking wordpress after a long gap there are many posts that i have in mind, many things to pen down and many photos to be posted on.. only if have little more time..

You know…

Standard

Recenntly one of my single friend asked me a mind blogging question .. how does it feel when people tak eyou for being married..? suddenly this topic.. some background. i got maried at age of 24 years.. it as a typical indian arranged marriage.Being the only girl child in family, i got married very soon.. me working in field of applications where we have to travel quiet frequently to different places to meet the requirement of each application and cater different fieldsbeing the only married girl in bunch of young boys and few girls .. i have listed a few things how i am being treated as i am the only married person in office in ladies staff….

1. Picnic plans are made and everyone forgets you to ask would you like to join us.
2. Every weekend is for cleaning and scrubbing and taking care of inlaws in taken for granted and bosses and other staff feel obliged to ask for working extra in office on weekends…
3. You are the target for stupidest joke in lunch time
4. Whenever any concert or party planning is going on, conventionallly it is onlyfor the single and married should not interfere…
5. Everyone will take you for granted to bring breakfast for them in morning by saying anyways you are making for 2 people why not add some and make for 5 people……
6. no epxectations that you will turn up all dressed for party.. there is always wrong makeup wrong matching if you are married .. if you still wear a red shoe with black jeans its fashion but same if married women wears it is fashion disaster…
7. Expected that your hubby will call you in lunch time no matter what…
8. If you say you are tiired … everyone winks and smiles………………..
9. You are expected to run always early from office as you have to cook,clean scrub for family no matter even though you leave office at 8.00pm
10. even though you are talking on phone with X person bosses turn around and look as if you are romancing your hubby in office hours.
11. You are not given a more often outdoor jobs as you have reponsibilities… though you never complained.
12. You are called expired product more often…..
13. If you are talking to some one for more than 15 mins .. apart from office work, you are called a flirt…
14. if yo complain a small ache or take leave, every1 expects its good news..

Swayamvar…

Standard

Finally after much of publicity stuunts Rahul Mahajan got married to Ms. Dimpy Ganguly a 20 year old model actress in bengali style wedding. Those who were following the show religiously might had already figured out who the bride would be…
One questions always cropped in my mind right from the day the show started.. what is Rahul Mahajan. A son of late Mr. Pramod Mahajan. According to Media is spoilt brat. a 34 year old divorced becuase of physically abusing his wife who was his childhood love, a brat in Big Boss whose passport is held by Indian govt because of possesion of drugs and not allowed to leave the country. Also his family background is worth taking into account, father actively into politics, mother a social worker,sister actively into politics after father death. Father killed by his own brother Pravin Mhajan over some family issues and currently in prison and demised after brain hammeroage.

Hardly a background for idle arrange amrriages in India where the social stigma is so hyped. Not that such persons cannot have arranged marriage but what do parents think when they send their daughters to such show???//
Firstly the girls chosen by Rahul are below 30 years of age when he himslef is 34 year old. One should consider this age gap between a girl and boy before getting married. How did the girls parents agree to this alliance.

When the parents already know he background of Rahul Mahajan why parents allow their daughters to get into such reality shows?????

Secondly all the girls are from modelling and acting field are he norms of actual marriage laid down by the parents itself.?

According to the recent show three girls where chosen as finalist, Dimpy Ganguly from Bengal, Nikung Malik from Haryana and Punjabi girl Harpereet. All of them extremly beautifull and talented. why did they get into the show for such alliance is a big question??????/

20 girls spent almost over 5 weeks in particpating for Rahuls Swayamvar … for Rahul it is just 5 weeks as he is used to this kind of life but what abou tthe other girls will they be hapy to return to happy normal life again ? will they readjust themselves again..after getting so intimate with rahul emotionally as most of the girls literally fell head over heels in love????????? what about them…?

As for now, new s came up that Harpreet is ready for 1 year contract marriage with Rahul Mahajan as the show promises actual swayamvar of Rahul with one of the girl in show..if this news is believed how did the parents agree to this.????????????????

As for now Nikunj who looked more sensible and matured comapred to another finalists is again coming back to senses and deciding not to marry Rahul due to his flirt manner and other habits… didnt she realise this before however she is no quitting the show…

One more thing the girl or her parents dont know whether the girl is actually goign to get married to rahul or being dumped by Rahul on national tv. How would the girl feel when shes beingr ejected by Rahul and still wish him all the best wishes in life when they are competing to become bride.. what about the reputation of family and girl after being dumped?????????

Whats the actual scenne between these contestants and their family ? Are they willing to take risk on their hard earned reputation for small amount of money and fame? Is Rahul Mahajan that worth??????????

Weekend trip to Alibaug and other places

Standard

A short distance yet enjoyable place for mumbaikas is Alibaug. Not far from Mumbai approx 60 kms. Alibaug is perfect weekend desitination. Apart from Alibaug there are near by places like Nagaon- Mrud Janjira whichare perfect weekend destination.
Heres the route we followed for 3 day/2 nights weekend.
Mumbai -Alibaug-Chaul-Nagoan-Murud-Janjira-Kashid- Alibau – Mumbai

Mumbai to Alibaug- 70 kms
Alibaug to Chaule- 15 kms
Chaule to Murud-36 kms
Murud to Janjira – 5 kms
Janjira to Kashid 28 kms
Kashid to Nagaon- 12 kms

Some of the beautiful snaps of this weekend.

Nagaon Beach –

.

Revdanda

Murud Janjira

Kashid Beach

Veer Sawarkar…

Standard

आज २६ फेब्रुवारी .. वीर सावरकरांची ४४ जयंती..
वीर सावरकर .. लोकांनी दिलेली उपाधी.. एक उतुंग असे व्यक्तिमत्व.. अश्या व्यक्तिमत्व बदल बरीच काही लिहिले गेले आहे. … तरीही थोडशी त्यांच्या बदल ची माहिती.. सकाळी radio वर ऐकली.. खरे तर जितुराज क़ुइज़ करत होता आज काय special आहे म्हणून.. पण एकालाही बरोबर उतर सांगता आले नाही.. बरे सकाळच्या पेपर मध्ये काही बातमी नाही.. … म्हटले .. चला आपणच जारा आपल्यला पोस्त वर माहिती देऊन त्यांची स्मरण करू या……

Chronology Of Savarkar’s Life
28 May 1883 – Born in Bhagur, a tiny village in Dist. Nasik, Maharashtra
1892 – Lost his mother Radhabai
1898 – Took an oath before the family deity to conduct armed revolt against British Rule
09 Sep 1898 – Lost his father Damodarpant

01 Jan 1900 – Founded Mitra Mela, a secret revolutionary society
01 Mar 1901 – Married Yamuna (Mai)

19 Dec 1901 – Passed Matriculation examination

24 Jan 1902 – Joined Fergusson College, Pune

May 1904 – Founded Abhinav Bharat – A revolutionary organisation

Nov 1905 – Organised the first public bonfire of foreign clothes in Pune

Dec 1905 – Passed B.A. examination

June 1906 – Left for London
10 May 1907 – Celebrated Golden Jubilee of Indian War of Independence 1857 in London

June 1907 – Wrote the book “Joseph Mazzini” which was later published by Babarao Savarkar
1908 – Wrote ‘Indian War of Independence 1857’. It was secretly published in Holland

May 1909 – Passed Bar-at-Law examination, but granting of permission to practice was denied
01 July 1909 – Madanlal Dhingra shot dead Curzon Wyllie in London

24 Oct 1909 – Vijayadashmi celebrated under the Chairmanship of Gandhi at India House, London

13 Mar 1910 – Arrested on arrival in London from Paris

08 Jul 1910 – Epic escape through the port hole of SS Morea while being taken to India
24 Dec 1910 – Awarded Transportation for Life

31 Jan 1911 – Awarded Transportation for Life for the second time, the only person in the history of the British Empire to have received it twice

04 Jul 1911 – Entered the Cellular Jail, Andamans

April 1919 – Yesuvahini, the wife of his elder brother passed away

21 May 1921 – Both brothers brought back to the Indian mainland
1921-1923 – Lodged at Alipore and Ratnagiri Jails

06 Jan 1924 – Released from Yerawada Prison and interned in Ratnagiri on condition that he would not participate in politics
07 Jan 1925 – Daughter Prabhat was born

10 Jan 1925 – A new weekly “Shraddhanand” launched in memory of Swami Shraddhanandji of Arya Samaj

Mar 1925 – Dr. Hedgewar, who was to found the RSS later, met Savarkar

01 Mar 1927 – Gandhi called on Savarkar at Ratnagiri

17 Mar 1928 – Son Vishwas was born

16 Nov 1930 – First interdining organized as a part of social reform campaign

Feb 1931 – Instrumental in establishment of Patitpavan Mandir open to all Hindus

25 Feb 1931 – Presided over Bombay Presidency Untouchability Eradication Conference

26 Apr 1931 – Chairman of the Somvanshi Mahar Parishad in the premises of Patitpavan Mandir

17 Sep 1931 – Arranged programmes such as keertan by a person belonging to the bhangi caste, interdining of 75 ladies as a part of social reform campaign
22 Sep 1931 – Prince of Nepal, Hem Bahadur Samsher Singh called on Savarkar

10 May 1937 – Unconditional release from internment at Ratnagiri

10 Dec 1937 – Elected as President of Akhil Bharat Hindu Mahasabha at its 19th Session at Karnavati (Ahmedabad) and continued to be re-elected President for the next seven years

15 Apr 1938 – Elected as President of Marathi Sahitya Sammelan

01 Feb 1939 – Started unarmed resistance against the Nizam of Bhaganagar (Hyderabad)

22 Jun 1941 – Netaji Subhas Chandra Bose called on Savarkar

25 Dec 1941 – Bhagalpur struggle

May 1943 – Public felicitations on the occasion of 61st birth anniversary

14 Aug 1943 – University of Nagpur conferred Honorary D.Litt. on Savarkar

05 Nov 1943 – Elected president of Marathi Natya Sammelan at Sangli

16 Mar 1945 – Elder brother Babarao passed away

19 Apr 1945 – Presided over All India Princely States Hindu Sabha Conference at Baroda (Gujarat)

08 May 1945 – Daughter Prabhat married at Pune

Apr 1946 – Bombay Government lifted ban on Savarkar’s literature

15 Aug 1947 – Hoisted both Bhagwa and Tricolour Flags on Savarkar Sadanto celebrate India’s independence

05 Feb 1948 – Arrested under the Preventive Detention Act after Gandhi’s murder

10 Feb 1949 – Acquitted in Gandhi Murder Trial

19 Oct 1949 – Youngest brother Dr. Narayanrao Savarkar passed away

Dec 1949 – Inaugurated Calcutta session of the Akhil Bharat Hindu Mahasabha

04 Apr 1950 – Was arrested and detained in Belgaum jail on the eve of arrival of Pakistani Prime Minister Liaquat Ali in Delhi

May 1952 – Public function held at Pune to announce the dissolution of Abhinav Bharat, the revolutionary society having achieved its aim of freeing India

Feb 1955 – Presided over Silver Jubilee celebrations of Patitpavan Mandir at Ratnagiri

23 Jul 1955 – Was the Chief Speaker at Lokmanya Tilak Centenary Celebrations in Pune

10 Nov 1957 – Main speaker at the Centenary Celebrations of the Indian War of Independence 1857 held in New Delhi

28 May 1958 – Accorded a civic reception by Greater Bombay Municipal Corporation on the occasion of his Diamond Jubilee

08 Oct 1959 – University of Pune conferred honorary D. Litt. at his residence

24 Dec 1960 – Mrityunjay Divas celebration – a day set down for the release of Savarkar after completing the sentences of two Transportation for Life

15 Apr 1962 – Sri Prakash, Governor of Bombay called upon Savarkar at his residence to pay his respects

29 May 1963 – Hospitalized for a fracture in the leg

08 Nov 1963 – Savarkar’s wife Yamuna passed away

Sep 1965 – Taken seriously ill

01 Feb 1966 – Takes a decision to fast unto death

26 Feb 1966 – 10.30 a.m., at the age of 83, Savarkar left his mortal coil

27 Feb 1966 – Cremation at the electric crematorium, the final salute given by 2500 uniformed swayamsevaks of the RSS and millions of admirers across the country